Home ठळक बातम्या भिवंडीतील संस्कार इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षपदी राम माळी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून...

भिवंडीतील संस्कार इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षपदी राम माळी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून अभिनंदन

भिवंडी, दि. 3 नोव्हेंबर :

भिवंडी तालुक्यातील आघाडीवरील शिक्षणसंस्था असा लौकिक असलेल्या ज्ञानज्योत समाजप्रबोधन मंडळाच्या संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलच्या अध्यक्षपदी राम माळी यांची, तर सचिवपदी दीपक म्हणेरा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांनी माळी यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

माणकोली परिसरातील भूमिपूत्र व नोकरदार वर्गाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून ज्ञानज्योत समाजप्रबोधन मंडळाच्या संस्कार इंग्लिश मिडियम स्कूलची ओळख आहे. या शाळेत सुमारे १४०० विद्यार्थी असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष राम माळी यांच्यासह नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले. या वेळी ज्ञानज्योत समाजप्रबोधन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि भिवंडी तालुका आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील उपस्थित होते. संस्कार इंग्लिश स्कूलच्या सचिवपदी दीपक म्हणेरा, उपाध्यक्षपदी लक्ष्मण माळी, भारत मढवी, खजिनदारपदी संदिप पाटील, सहसचिवपदी लक्ष्मण म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

ज्ञानज्योत समाजप्रबोधन मंडळाची २००२ मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्याकाळात ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शिक्षण मिळण्यातील अडचणी लक्षात घेऊन माणकोली येथे पहिल्यांदा संस्कार इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली होती. या शाळेच्या स्थापनेपासून श्री. राम माळी हे संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांत शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढील काळात शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष राम माळी यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा