Home ठळक बातम्या डोंबिवलीत यंदाही जल्लोषात रंगणार “रासरंग – २०२३”

डोंबिवलीत यंदाही जल्लोषात रंगणार “रासरंग – २०२३”

महत्वाच्या व्यक्तींसह नारीशक्तीचा होणार सन्मान

डोंबिवली दि.11 ऑक्टोबर :
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित रासरंग – २०२३ या महोत्सवाचे यंदाही भव्यतेने आयोजन करण्यात आले आहे.
नेत्र दिपवणारा भव्य मंच, गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा, दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत, सिने अभिनेत्यांची, कलावंताची, मान्यवरांची मांदियाळी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा, नवदुर्गांचा सन्मान अशा विशेष सोहळ्यांसह यंदाचा रासरंग – २०२३ संपन्न होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे 6वे वर्ष असून डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. (“Rasrang – 2023” will be celebrated in Dombivli this year too)

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवली शहरासह संपूर्ण मतदारसंघात विविध सणोत्सवांच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात भव्य स्वरूपात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जागतिक कीर्तीचे अनेक कलावंत या उपक्रमाला उपस्थिती लावत असतात.

नैतिक नागदाच्या तालावर थिरकणार नृत्य रसिक

या नवरात्र उत्सवात दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नैतिक नागदा यांची विशेष उपस्थिती असणार आहे. नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि वाद्यांच्या सुंदर आणि तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसहवयोवृद्ध नागरिकही मनमुरादपणे गरबा नृत्याचा आनंद घेत असतात. यंदाही नैतिक यांच्या विशेष सादरीकरणाची रासरंगला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना अनुभूती घेता येणार आहे. नैतिक यांचे सादरीकरण हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

सिने अभिनेते आणि कलावंताची मांदियाळी

दरवर्षी प्रमाणे यंदाही रासरंग – २०२३ महोत्सवात सिने अभिनेतेकलावंतांची विशेष उपस्थित असणार आहे. आतापर्यंत रासरंग उपक्रमात अनेक नामवंत कलाकारसिने अभिनेतेदिग्दर्शक यांची उपस्थित लाभली आहे. या सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक  वाढणार आहे.

मान्यवरांचा सत्कार

या महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली मतदारसंघातील नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील विविध  क्षेत्रांतील नामवंत व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.

नवदुर्गांचा सन्मान

नवरात्रौस्तव म्हणजे नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव. याच पार्श्वभूमीवर महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

महिलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…
महिला – भगिनींसाठी  या उत्सवात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पाचव्या दिवशी महिलांसाठी भोंडला कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या महिलांना विविध बक्षिसेही देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक ठेवा जपणारा महोत्सव – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, 
दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रासरंग – २०२३ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक ठेवा जपणारा हा महोत्सव आतापर्यंत सर्व डोंबिवलीवासियांच्या पसंतीस उतरला असून, उत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावत महोत्सवाचा आनंद घेतला आहे. यंदाही या महोत्सवात  जल्लोषात आणि उत्साहात नागरिकांनी सहभाग घ्यावा.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा