Home ठळक बातम्या ‘उल्हास नदी बचाव’ आंदोलनाला रवी पाटील फाऊंडेशनचाही पाठींबा

‘उल्हास नदी बचाव’ आंदोलनाला रवी पाटील फाऊंडेशनचाही पाठींबा

कल्याण दि.15 फेब्रुवारी :
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रवी पाटील फाऊंडेशननेही आपला पाठींबा जाहीर केला आहे. फाऊंडेशनचे प्रमूख रवी पाटील यांनी रविवारी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
गेल्या 4 दिवसांपासून मी कल्याणकर संस्थेच्या माध्यमातून नितीन निकम हे आंदोलनाला बसले आहेत. कोणतेही प्रक्रिया न करता उल्हास नदीत सोडले जाणारे सांडपाणी तातडीने बंद होण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून त्याला राजकीय आणि सामाजिक संस्थांचा पाठींबा वाढत आहे. त्यात रवी पाटील फाऊंडेशननेही या आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केल्याची माहिती शिवसेना नेते रवी पाटील यांनी दिली.
तसेच यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी रवी पाटील यांनी यावेळी फोनद्वारे चर्चा केली. त्यात संबंधित विभागाला तातडीने हा प्रश्न सोडवण्याबाबत सूचना देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा