Home कोरोना सप्तसूर झाले पोरके ; गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

सप्तसूर झाले पोरके ; गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

 

मुंबई दि.6 फेब्रुवारी :
गेली कित्येक दशके सप्तसुरांसह श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या तेजस्वी संगीतपर्वाचा आज अस्त झाला. गानकोकिळा अशी ओळख असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. कोरोना झाल्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती परंतू अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. (Saptasur became an orphan; Empress Bharat Ratna Lata Mangeshkar behind the curtain of time)

लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये त्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामूळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

संगीत क्षेत्रात लता दीदी अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत गाणी गायली असून 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांनाही त्यांनी आपल्या सुमधुर स्वरांचा साज चढवला आहे. 2001 मध्ये त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात असून 1989 मध्ये त्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या.

गेली अनेक वर्षे आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा आवाज कायमचा हरपल्याने सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. एलएनएन परिवारातर्फेही लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा