Home क्राइम वॉच डोंबिवली पश्चिमेत मद्यधुंद कारचालकाची सात ते आठ गाड्यांना धडक

डोंबिवली पश्चिमेत मद्यधुंद कारचालकाची सात ते आठ गाड्यांना धडक

गाड्यांचे मोठे नुकसान काही जणांना किरकोळ दुखापत

डोंबिवली दि.1 जून :
मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या इनोव्हा चालकाने बेधुंदरपणे गाडी चालवत अनेक गाड्यांना धडक दिल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेत घडला आहे. गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजता ही घटना घडली असून यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Seven to eight cars were hit by a drunk driver in Dombivli West)

डोंबिवली पश्चिमेच्या महाराष्ट्र नगर ते विष्णुनगर पोलीस ठाणे दरम्यान हा सर्व प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारच्या चालकाने अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत रिक्षा, बाईकसह तब्बल 11 गाड्यांना धडक दिली यामध्ये रिक्षातील तीन ते चार आणि बाईक वरील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे.

दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या कारचालकाला बेदम चोप देत विष्णू नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमध्ये सुदैवाने नागरिकांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्या गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा