Home क्राइम वॉच धक्कादायक : डोंबिवलीत खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा मृत्यू

धक्कादायक : डोंबिवलीत खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा मृत्यू

 

डोंबिवली दि.9 ऑक्टोबर :
डोंबिवलीतील भोपर गावात असणाऱ्या खदाणीमध्ये बुडून दोघा मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी हा प्रकार घडला असून काही मुलं या खदाणीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते.

डोंबिवलीजवळील भोपर गावातल्‍या गावदेवी मंदिरामागे असणाऱ्या या खदाणीत आयरे गावातील पाच सहा मित्र पोहायला उतरले होते. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले आणि त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. ज्याचा आवाज ऐकून काही गावकऱ्यांनी खदाणीजवळ धाव घेत चार मुलांना बाहेर काढले. तर दोघा मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा