Home ठळक बातम्या छ्त्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यावर आधारित प्रदर्शनाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छ्त्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यावर आधारित प्रदर्शनाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली माऊंटेनिअर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

डोंबिवली दि.30 सप्टेंबर :

डोंबिवली माउंटेनिअर्स असोसिएशन म्हणजेच मॅड संस्थेतर्फे डोंबिवलीत “साहस” या शिवकालीन दुर्ग – शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील सुवर्णकाळाची सफर पाहण्यासाठी डोंबिवलीकरांसह इतिहास प्रेमींची या प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे.

या उद्देशाने झालेय आयोजन…
तरूणांमध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती याबाबत अभिमान तसेच निसर्ग- गिर्यारोहणाविषयी आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्या आले आहे.

प्रदर्शनात हे मिळेल पाहायला…
या प्रदर्शनामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे “सिंधुदुर्ग – विजयदुर्ग ” या किल्ल्यांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृतीही सादर करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, तोफ-गोळे, मोडी-लिपीतील कागदपत्रे,पारंपरिक बैठे खेळ तसेच सह्याद्री भ्रमण आणि गिर्यारोहण विषयीची साधने ,पुस्तके,माहितीपट असे सर्व काही एकाच ठिकाणी पाहण्याचा उत्कट अनुभव डोंबिवलीकरांना घेता येत आहे.

याठिकाणी रविवारपर्यंत सर्वांसाठी आहे खुले…
शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन रविवार 1 ऑक्टोबरपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे. डोंबिवली पूर्वेतील सफायर बँक्वेट हॉल , तिसरा मजला,पी.पी.चेंबर्स, शहीद भगतसिंग रोड येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजे पर्यंत हे “साहस” प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

या संस्थांचे लाभलेय सहकार्य…
या प्रदर्शनासाठी माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) सह अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन,”वेध”, सफायर बँक्वेट हॉल, रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा