Home Uncategorised महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू करा – भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष...

महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू करा – भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी

 

कल्याण दि.8 मार्च :
राज्यात सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. कल्याणातील आर्ट गॅलरी कोवीड हॉस्पिटलमध्येही गेल्या आठवड्यात एका महिलेच्या विनयभंगाची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड पॉझिटीव्ह महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू करण्याची (start-separate-covid-centres-for-covid-positive-women-patients) मागणी भाजप महिला मोर्चातर्फे (bjp women’s wing) करण्यात आली आहे. भाजप महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोव्हीड सेंटर तयार करत त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्याची मागणी भाजपच्या या महिलांच्या शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर आता केडीएमसी प्रशासन काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा