Home ठळक बातम्या मलंगगड भागातील अघोषित लोडशेडिंग बंद करा – भाजपची महावितरण कार्यालयावर धडक

मलंगगड भागातील अघोषित लोडशेडिंग बंद करा – भाजपची महावितरण कार्यालयावर धडक

 

कल्याण दि.२५ एप्रिल :
कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडींग सुरू झाल्याने नागरिक कमलीचे हैराण झाले आहेत. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांनी संतप्त नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक देत हे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली.

कल्याण ग्रामीण परिसरातील मलंगगड भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी लोडशेडिंगबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच सरकारवर टीका करताना ते म्हणाले की खासगी उद्योजकांकडून चढ्या दराने वीज विकत घ्यायची असल्याने जाणीवपूर्वक हा विजेचा लपंडाव सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.

तसेच कोळसा नाहीये असे कारण द्यायचे आणि मग दुसऱ्याकडून वीज विकत घ्यायची आणि त्यात भ्रष्टाचार करायचा असा सरकारचा उद्देश असल्याचा घणाघातही आमदार गायकवाड यांनी केला. तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या मोर्चावरही त्यांनी टीका केली. सत्ताधारीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढतात, याचा अर्थ सरकार काम करत नाहीये. आपण मोर्चा काढल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानतो असे सांगत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा