Home ठळक बातम्या विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये प्राविण्य दाखवले तरी चांगले करिअर घडू शकेल – जगन्नाथ (आप्पा)...

विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये प्राविण्य दाखवले तरी चांगले करिअर घडू शकेल – जगन्नाथ (आप्पा) शिंदे

पहिल्या वहिल्या ठाणे जिल्हा क्रिडा महोत्सवाचे दणक्यात उद्घाटन

कल्याण दि.29 जानेवारी :
आपल्या मातीतील सचिन तेंडुलकरसारखा एक खेळाडू त्याने क्रिकेटमध्ये दाखवलेल्या कौशल्यामुळे आज इतका मोठा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखवले तरी त्यांचे चांगले करिअर घडू शकते असा मोलाचा सल्ला केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिला.

आप्पा शिंदे यांच्या 74 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा आटयापाट्या संघटना आणि जगन्नाथ शिंदे क्रिडा गौरव समितीतर्फे आयोजित पहिल्या ठाणे जिल्हा क्रिडा महोत्सवाचे कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर दणक्यात उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तत्पूर्वी अर्जुन आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसह इतर खेळाडूंच्या उपस्थितीत तिसाई देवी मंदिरापासून ते दादासाहेब गायकवाड क्रीडांगणापर्यंत क्रिदाज्योत आणण्यात आली.

आपल्याकडील सर्व मैदानी खेळ हे आज भारतभर पसरले आहेत. महाराष्ट्रात तर हे खेळ चांगल्या प्रकारे खेळले जात असून इतर खेळांचाही जोमाने विकास होण्यासाठी असे क्रिडा महोत्सव अतिशय गरजेचे आहेत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खेळांबद्दल आणि व्यायामाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा महोत्सव आयोजित करण्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ असे आवाहनही आप्पा शिंदे यांनी यावेळी केले.

जिल्हा क्रीडा महोत्सवात या खेळांच्या स्पर्धा…
जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा आटयापाट्या संघटनेतर्फे आयोजित क्रिडा महोत्सवात बैठ्या खेळापासून ते मैदानी खेळापर्यंत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. 29 आणि 30 जानेवारी रोजी शालेय प्रो कबड्डी, बुद्धीबळ, टेनिस बॉल क्रिकेट, लंगडी, 31जानेवारी रोजी खो खो, टेनीक्वाईट , तलवारबाजी, कॅरम, आर्चरी आणि 4 फेब्रुवारी रोजी आटयापाट्या खेळाने या महोत्सवाचा समारोप होणार असल्याची माहिती आयोजक अंकुर आहेर सर यांनी दिली.
तर या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील शेकडो खेळाडू सहभागी झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा