Home ठळक बातम्या उजव्या बाजूला हृदय सरकलेल्या दिड वर्षांच्या चिमुकल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; खासदार डॉ. श्रीकांत...

उजव्या बाजूला हृदय सरकलेल्या दिड वर्षांच्या चिमुकल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

ठाणे दि.29 सप्टेंबर :
उजव्या बाजूला हृदय असणाऱ्या दिड वर्षांच्या चिमुकल्यावर मुंबईच्या वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्याच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहणाऱ्या 18 महिन्याच्या युग महाजनचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्याच्या पालकांचा लक्षात आले. त्याचे वडील प्रविण महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मुलाच्या उपचारासाठी धावपळ केली. मात्र मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये उपचार केल्यावाचून पर्याय नसल्याचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. मात्र छोटासा छायाचित्रकाराचा व्यवसाय असणाऱ्या प्रविण महाजन मुंबईतील रुग्णालयांचा खर्च आणि उपचार परवडतील का अशा विवंचनेत प्रवीण महाजन होते. त्याचदरम्यान त्यांची भेट कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी झाली आणि त्यांनी आपल्या चिमुकल्याच्या उपचाराची बाब त्यांच्या कानावर टाकली. त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही युग महाजनची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती घेऊन तातडीने शस्त्रक्रियेसाठी कार्यवाही सुरू केली. मुंबईतील लहान मुलांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाडिया रुग्णालयाचे प्रमुख डॉ. निरंजन गायकवाड यांच्याशी खासदार डॉ. शिंदे यांनी चर्चा केली.

त्यात युगवर कंजेनिटल डायफ्रॅगमॅटिक हर्निया ही शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे आणि त्यासाठी सुमारे साडेतीन ते चार लाखांचा खर्च अपेक्षित होता. तर घरची बेताची परिस्थिती पाहून महाजन यांच्यासमोर पैशांच्या जमवाजमव करण्याचे संकट उभे होते. मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा उपचाराचा खर्च अगदीच शून्यावर आणत दिड वर्षाच्या युगवर मोफत शस्त्रक्रिया करून घेतली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महाजन कुटुंबियांनी युगसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेले सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नसल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा