Home ठळक बातम्या टँकरचा ब्रेकफेल : ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

टँकरचा ब्रेकफेल : ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील घटना

कल्याण दि.१३ एप्रिल :
टँकर चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत दाखवलेल्या समय सुचकतेमुळे कल्याण पूर्वेत एक मोठा अपघात कळला. रस्त्याच्या उतारावर टँकरचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येतात चालकाने हा टँकर थेट डिव्हायडरवर चढवला आणि पुढची मोठी दुर्घटना टळली.

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर सुशोभीकरणांतर्गत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांना दररोज टँकर किंवा टेम्पोच्या माध्यमातून पाणी टाकण्याचे काम केले जाते. कल्याण पूर्वेतील काटे मानवली परिसरात असणाऱ्या पुन्हा लिंक रोडवर लिंक रोडवरील दुभाजकांमधील झाडांना आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हा टँकर ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील उतारावर आला. आपल्या टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे त्याच्या चालकाच्या लक्षात आले. आणि चालकाच्या मनात एकच धस्स झालं.

परंतु त्याने घाबरून न जाता प्रसंगावधान दाखवत ज्या डिव्हायडर वरील झाडांना पाणी टाकत टाकण्याचे काम सुरू होते, त्याच डिव्हायडरवर हा टँकर चढवला आणि पुढची मोठी दुर्घटना टाळली. टँकर चालकाच्या या समय सूचकतेमुळे अनेकांचा जीव मोठा अपघात होता होता वाचल्याने नागरिकांनी या टँकर चालकाचे कौतुक केले आहे. कल्याण पूर्वेतील पुन्हा लिंक रोड हा एक महत्त्वाचा रस्ता असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा अभ्यास होण्याची शक्यता होती. परंतु टँकर चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा