Home ठळक बातम्या थेट भरधाव एक्स्प्रेससमोर मुलाने मारली उडी…रेल्वे पोलिसाने केले असे काही की होतेय...

थेट भरधाव एक्स्प्रेससमोर मुलाने मारली उडी…रेल्वे पोलिसाने केले असे काही की होतेय कौतूक

 

विठ्ठलवाडी स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

विठ्ठलवाडी दि.23 मार्च :
भरधाव वेगात येणाऱ्या एक्स्प्रेससमोरच थेट उडी मारणाऱ्या मुलाचा जीव रेल्वे पोलिसाने अक्षरशः आपल्या जीवाची बाजी लावून वाचवल्याचा थरारक प्रसंग आज विठ्ठलवाडी स्थानकात घडला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या रेल्वे पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होतोय. (The boy jumped directly in front of speedy Express )

उल्हासनगरमध्ये राहणारा हा मुलगा आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रेंगाळत असल्याने ड्युटीवर असणाऱ्या ऋषिकेश माने या रेल्वे पोलिसाला त्याचा संशय आला. दुपारी साधारणपणे अडीच वाजण्याच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात दाखल होताच या मुलाने थेट या गाडीसमोरच उडी मारली. मात्र त्याच्याच मागे असणाऱ्या माने यांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या पाठोपाठ रेल्वे रुळांवर उडी घेतली आणि त्या मुलाला रुळांवरून बाजूला केले. आणि अवघ्या काही सेकंदात मदुराई एक्स्प्रेस वेगाने तिकडून निघून गेली. अक्षरशः अंगावर काटा आणणारा आणि काळजाचा ठोका चुकवणारा असा हा क्षण होता. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर घडलेल्या या घटनेने प्रवाशांसह सर्वाचा श्वास रोखला गेला. मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह रेल्वे पोलिस व्यवस्थित असल्याचे दिसताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. रेल्वे पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तर तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या ऋषिकेश माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा