Home ठळक बातम्या द केरला स्टोरी : कल्याणात अनेक मुली आणि महिलांनी चित्रपट पाहून घेतली...

द केरला स्टोरी : कल्याणात अनेक मुली आणि महिलांनी चित्रपट पाहून घेतली ही शपथ…

 

माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे मोफत शोचे आयोजन

कल्याण दि.18 मे :
द केरला स्टोरी चित्रपटामूळे सध्या सगळीकडे एका वेगळ्याच सामाजिक विषयाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. कल्याणातही अनेक मुली आणि महिलांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर शपथ घेतली. माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे 18 वर्षांवरील मुली आणि स्त्रियांसाठी या मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते. (The Kerala Story: In Kalyan, many girls and women swore after watching the movie…)

केरळमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून झालेल्या धर्मांतरासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर द केरला स्टोरी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. केरळमधील हिंदू मुलींचे कशाप्रकारे लव्ह जिहादच्या माध्यमातून शोषण केले करून कुटुंबापासून तोडले जाते आणि मग धर्मांतराद्वरे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी केले जात असल्याचे विदारक चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाला संपूर्ण देशभरात तुफान प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या विद्यार्थिनी, युवती आणि महिलांमध्ये लव्ह जिहादबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही या मोफत शोचे आयोजन केल्याची माहिती कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी दिली.

दरम्यान यावेळी उपस्थित युवती आणि महिलांनी धर्मांतर किंवा लव्ह जिहादला कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नसल्याची शपथही घेतली. तसेच महिलांनी यावेळी जय श्रीराम, छ्त्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी चित्रपटगृह दणाणून सोडले. तर डॉ. उपेंद्र डहाके यांच्यामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थीनी, तरुणीना लव जिहाद एक षडयंत्र या पुस्तकाचे वाटपही यावेळी करण्यात आले.

यावेळी कल्याण विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी गणेश काळण, प्रविण हेंद्रे, कल्पेश जोशी, राहुल भोईर, सदा कोकणे, रुपचंद राठोड, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, समृद्धी देशपांडे, मनिषा केळकर, प्रिती दिक्षित, जयश्री देशपांडे, रत्ना कुलथे, हिंदू युवा मंचचे विवेक गायकर, इस्कॉनचे मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा