Home ठळक बातम्या लोढा पलावा परीसरात आता ऑफलाईन पध्दतीने होणार घरगुती गॅसपुरवठा

लोढा पलावा परीसरात आता ऑफलाईन पध्दतीने होणार घरगुती गॅसपुरवठा

 

महानगर गॅस कंपनीने मानले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार

डोंबिवली दि.18 जून :
पलावा आणिआजूबाजूच्या परीसरात मोठ्याप्रमाणावर नागरी वस्ती वाढत असून त्यात असंख्य नागरीक रहाण्यासाठी येत आहेत. या नागरीकांना पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा घराघरात चालू करावा अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महानगर गॅस कंपनीकडे केली. यासाठी खासदार कार्यालयप्रमुख या नात्याने पाठपुरावा करावा असे कार्यालय प्रमुख श्री. प्रफुल्ल देशमुख यांना सांगीतले.

याबाबत महानगर गॅस कंपनीकडे पाठपुराव्यानंतर मानपाडा येथे स्टील लाईन टाकण्याचे काम सुरू असून या परीसरात गॅस पुरवठा करण्यासाठी सुमारे ३/४ किलोमिटर गॅसची स्टील लाईन टाकणे जरूरी आहे. तसेच दिवा-पनवेल रेल्वे मार्गाच्या रूळांखालून ही लाईन टाकावी लागणार असून त्यासाठी किमान २/३ वर्षे कालावधी लागू शकतो. या पार्श्वभमीवर त्वरीत गॅस पुरवठा सुरू करण्यासाठी या भागात ऑफलाईन पध्दतीने (ज्याप्रमाणे सीएनजी पंपांना कंपनीकडून गाडी पाठवून गॅस पुरवठा केला जातो त्यानुसार) गॅस पुरवठा करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती.

यादृष्टीने महानगर गॅस कंपनीने सर्व तांत्रीक बाजू तपासण्याची कार्यवाही सुरू केली असता त्यामध्ये अनेक अडचणी समोर आल्या. मात्र सर्व अडचणींवर मात करण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले असून प्रायोगीक तत्वावर खोणी येथे लोकशेअर ग्रीन परीसरातील रस्त्यावर ५० मिटर पट्ट्यात स्टील लाईन टाकण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. यामुळे आता लोढा पलावा शहर, कासा बेला, कासा रीओ इत्यादी परीसरातील रस्त्यांखालून स्टील लाईन टाकण्याचे काम करणे आता सुकर झाले आहे.

पलावा शहर येथील लेकशोअर, कासाबेला, कासा रीओ 1या तीन ठिकाणी गॅस सिलेंडर्सची विशीष्ट ठिकाणी आणि आवश्यक त्या तांत्रीक गोष्टींची काळजी घेउन योग्य पध्दतीने साठवणूक करण्यात येइल. आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक घरात गॅसपुरवठा केला जाणार आहे. या कामाबरोबरच प्रत्येक ईमारतीत आणि प्रत्येक ब्लॉकमधील फिटींग्जचे कामही पूर्ण करण्यात येइल. त्यानंतर टप्प्या टप्प्याने नागरीकांच्या घराघरात घरगुती गॅसपुरवठा सुरू होइल अशी माहीती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

प्रत्येक टप्प्यावर असंख्य अडचणी आल्या मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे त्यावर मात करणे शक्य झाल्याबद्दल महानगर गॅस कंपनीने एका पत्राद्वारे खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा