Home ठळक बातम्या पावसामुळे डोंबिवलीतील उद्धव ठाकरे यांची आजची प्रचार सभा रद्द

पावसामुळे डोंबिवलीतील उद्धव ठाकरे यांची आजची प्रचार सभा रद्द

16 तारखेला सभा होण्याची शक्यता – शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांची माहिती

कल्याण दि.13 मे :
कल्याण डोंबिवलीमध्ये दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे आज होणारी उध्दव ठाकरे यांची डोंबिवलीतील जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे.(Today’s campaign meeting of Uddhav Thackeray in Dombivli canceled due to rain)

कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज डोंबिवलीतील भागशाळा मैदानात ही जाहीर सभा होणार होती. मात्र आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मैदानात चिखल झाला असून आसन व्यवस्था आणि मंच देखील ओला झाल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

तसेच आज रद्द झालेली ही सभा येत्या 2 ते 3 दिवसात पुन्हा घेतली जाईल अशी माहिती कल्याण जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ आणि युवानेते वरुण सरदेसाई यांनी दिली.
दरम्यान ही सभा येत्या गुरुवारी 16 मे रोजी होण्याची शक्यता आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा