कल्याण -डोंबिवली दि.18 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 19 जुलै रोजी केवळ 4 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. त्यातही 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचा 2रा तर उर्वरित 2 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचा केवळ 2रा डोस दिला जाणार आहे. लस साठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.
यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असून ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही केडीएमसितर्फे देण्यात आली.