Home ठळक बातम्या 27 गावातील वाढीव मालमत्ता कराच्या बिलांची संघर्ष समितीकडून होळी

27 गावातील वाढीव मालमत्ता कराच्या बिलांची संघर्ष समितीकडून होळी

 

कल्याण दि.9 नोव्हेंबर :

कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील नागरीकांनी आज महापालिकेवर मोर्चा काढत वाढीव मालमत्ता करांच्या बिलाची होळी करण्यात आली. २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

२७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर दहा पटीने मालमत्ता कर वाढविण्यात आल्याचा आरोप संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला होता. यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दत्ता वझे, गजानन मांगरूळकर, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, सत्यवान म्हात्रे आदी प्रमुख पदाधिकार्यासह मनसेने ही आंदोलनाला पाठींबा देत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

२७ गावातील नागरिक वाढीव कर भरणार नाहीत, महापालिकेचे अधिकारी- कर्मचारी जबरदस्तीने कर वसूल करण्यासाठी आल्यास आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केडीएमसीची राहील असा इशाराही देण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा