Home ठळक बातम्या लोहगडाची डोंबिवलीतील 50 फूट लांब भव्य प्रतिकृती ठरतेय दुर्गप्रेमींचे आकर्षण

लोहगडाची डोंबिवलीतील 50 फूट लांब भव्य प्रतिकृती ठरतेय दुर्गप्रेमींचे आकर्षण

 

डोंबिवली दि. 7 नोव्हेंबर :
दीपावलीच्या काळात किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि आपले ऐतिहासिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची परंपरा डोंबिवलीतीला अरुण निवास मंडळाने यंदाही जपल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली पश्चिमेच्या जुनी डोंबिवली येथील अरुण निवास मित्र मंडळाने साकारलेल्या ऐतिहासिक लोहगडाची भव्य प्रतिकृती दुर्गप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय.

तब्बल यांनी 650 गोण्या डेम्ब्रिज,150 गोण्या लाल माती, 70 गोण्या काळी माती पासून आणि दगड-विटांपासून भव्य लोहगड किल्ला तयार केला आहे. 50 फूट लांब , साडे 7 फुट उंच आणि 20 फूट रुंद एव्हडा मोठा हा किल्ला आहे.

आता हा किल्ला पाहण्यासाठी डोंबिवली मधील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अरुण निवास मंडळाच्या जवळपास 30 सदस्यांनी हा किल्ला तयार केला आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यँत सर्वांनी हातभार लावला असून हा किल्ला बनवण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी अथक मेहनत घेतली आहे. तब्बल 10 दिवस हा किल्ला तयार करण्यासाठी लागले. सकाळी ऑफिसचे काम आणि रोज रात्री जागरण करून लोहगडाची ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

अरुण निवास मित्र मंडळ यांचे किल्ले बनवण्याचे यंदा 14 वे वर्ष असून त्यांना किल्ले बांधणी स्पर्धेत अनेक बक्षिसेही प्राप्त झाली आहेत. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग, राजगड, रायगड, नळदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पदमदुर्ग, मुरुड-जंजिरा, पुरंदर-वज्रगड, खंदेरी-उंदेरी हे किल्ले तयार केले आहेत. तसेच जगदीश्वराचे मंदिर हुबेहूब प्रतिकृती साकारली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा