Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील आमदारांचा 50 वर्षांहून जुना घरगूती गणेशोत्सव

कल्याण पश्चिमेतील आमदारांचा 50 वर्षांहून जुना घरगूती गणेशोत्सव

गणेशोत्सव साजरा करण्यामागे आहे रंजक कारण

कल्याण दि.24 सप्टेंबर :
कल्याणातील सार्वजनिक गणेशोत्सवाला जशी ऐतिहासिक परंपरा आहे. त्याचप्रमाणे इथल्या घरगुती गणेशोत्सवाचीही एक वेगळी ओळख आहे. जी तब्बल तीन तीन पिढ्यांपासून चालत आलेली आहे. कल्याण पश्चिमेतील संवेदनशील आमदार अशी ओळख असणाऱ्या विश्वनाथ भोईर कुटुंबियांकडे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामागे एक रंजक कारण आहे.

विश्वनाथ भोईर कुटुंबिय हे कल्याणातील जुन्या आणि भूमीपुत्र कुटुंबांपैकी एक. त्यांच्या घरी गेल्या 5 दशकांहून अधिक काळापासून हा गणेशोत्सव साजरा होतोय. पूर्वीच्या काळी मुंबई पुण्यानंतर कल्याणातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव आपल्या देखाव्यासाठी प्रसिद्ध होता. पौराणिक, धार्मिक, सामाजिक विषयांवरील देखावे हे चलचित्रांच्या माध्यमांतून सादर केले जात. त्यामध्ये सध्या काळानुरूप बदल झाले असले तरी विश्वनाथ भोईर कुटुंबियांनी मात्र चलचित्रांची ही संकल्पना आजही कायम ठेवली असल्याचे दिसून येते.

आपल्या घरच्या गणेशोत्सवाबाबत आमदार भोईर यांनी सांगितले की आमच्याकडे गेल्या 53 वर्षांपासून हा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याचे विशेष म्हणजे आपल्या जन्माचा नवस म्हणून हा आमच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचे आमदार भोईर म्हणाले. तर स्थापनेपासूनच आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती आणत असल्याचे सांगत भोईर कुटुंबियांकडून पूर्वीपासूनच हा सण पर्यावरण पूरक साजरा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर श्री गणेशाच्या आगमनाने बळीराजाचे भले होऊ दे आणि आपण कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या हातून राज्यातील जनतेसाठी अनेक सुखकारी कामं होऊ देत अशी प्रार्थनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी गणराया चरणी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा