Home ठळक बातम्या शहाडमधील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट ; काही कामगार जखमी

शहाडमधील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट ; काही कामगार जखमी

शहाड दि.23 सप्टेंबर : 

कल्याण मुरबाड मार्गावर शहाड भाग आज सकाळी सेंच्युरी कंपनीत झालेल्या स्फोटाने हादरून गेला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून त्यात काही कामगार जखमी तर काही दगावले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र यामध्ये मृत्यू झालेल्या कामगारांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

तर या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस, अग्निशमन प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

अधिक माहिती लवकरच…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा