Home ठळक बातम्या डोंबिवली पूर्वेच्या स्टेशन परिसरात इमारतीमधील गोडावूनमध्ये आग

डोंबिवली पूर्वेच्या स्टेशन परिसरात इमारतीमधील गोडावूनमध्ये आग

 

डोंबिवली दि.15 जुलै :

डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या गोडाऊनमध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. गोडावूनमध्ये प्लास्टिकचे साहित्य असल्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे स्टेशन परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान लक्ष्मी निवासी इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. या इमारतीमध्ये काही दुकानं सुरू होती तर दुसरा मजल्यावर काही दुकानदारांनी, फेरीवाल्यांनी आपले साहित्य ठेवले होते. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा