Home कोरोना कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड

कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड

..तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना/ व्यवसाय कोवीड असेपर्यंत सील

कल्याण – डोंबिवली दि.14 जुलै :
अथक प्रयत्नांनंतर कल्याण डोंबिवलीतील कोवीड परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली असली तरी बहुतांश ठिकाणी सध्या लागू असणाऱ्या कोवीड नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. नियम पाळण्याबाबत वारंवार सूचना करूनही दुकानदार आणि व्यावसायिकांकडून त्याला हरताळच फासला जात असल्याने अखेर केडीएमसी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि व्यावसायिकांना 10 हजारांचा दंड भरावा लागणार असून त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना/ व्यवसाय कोवीड असेपर्यंत सील करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, फुड कोर्ट, मद्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. तसेच उपस्थित असलेले ग्राहक, कर्मचारी, व्यवस्थापक हे तोंडावर मास्क न लावण्याची तसदी न घेण्यासह दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे केडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा बेफिकीर वृत्तीमुळे कोवीडचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कोवीडबाबतच्या सोशल डिस्टन्स, मास्क घालण्याच्या आणि दिलेल्या वेळेचे पालन न करणाऱ्या दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांवर आर्थिक दंड आकारण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.क हे यापुढे द्रव्यदंडास पात्र ठरणार आहेत.

अशी आहे दंडाची तरतूद…
हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी पहिल्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास 10 हजार रुपये दंड लागू केला जाणार आहे. तर अन्य आस्थापनांना पहिल्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास 5 हजारांचा दंड केला जाणार आहे. दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटला 20 हजारांच्या दंडास पात्र असतील. तर अन्य आस्थापनांना दुसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास 10 हजारांचा दंड लागू होईल. तर तिसऱ्या भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास covid-19 ची अधिसूचना संपुष्टात येईपर्यंत संबंधित हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, दुकाने / आस्थापना सील करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा