Home ठळक बातम्या श्रीराम नवमी निमित्त कल्याणात भाजपतर्फे भव्य शोभायात्रा

श्रीराम नवमी निमित्त कल्याणात भाजपतर्फे भव्य शोभायात्रा

 

कल्याण दि.10 एप्रिल :
शोभयात्रेच्या माध्यामातून कल्याणात आज भाजपतर्फे श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भव्य प्रतिकृती तसेच श्रीरामाच्या, हनुमंताच्या वेशातील बच्चे कंपनी या शोभायात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.

कल्याण जिल्हा भाजप, माजी आमदार नरेंद्र पवार आणि विकी, सौरभ गणात्रा बंधूंच्या संयुक्त विद्यमाने कल्याणात प्रथमच या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेच्या सुंदर नगर येथून ही शोभायात्रा सुरू होऊन आग्रा रोड, बेतुरकर पाडा, श्रीराम मंदिर, सहजानंद चौक, संतोषी माता रोडमार्गे यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे समाप्त झाली.

माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान जय श्रीरामच्या घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा