Home ठळक बातम्या कल्याणच्या रामबाग परिसरात एकमजली घर कोसळले ; एकाचा मृत्यू तर एक जण...

कल्याणच्या रामबाग परिसरात एकमजली घर कोसळले ; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

नातेवाईकांकडे गेले असल्याने वाचला तिघा मुलांचा जीव

कल्याण दि.२९ जून :
कल्याणात एकमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तर त्यांची तीन मुलं रात्रीच नातेवाईकांकडे गेली असल्याने तिघांचा जीव वाचल्याची माहितीही समोर आली आहे.

रामबाग लेन 1 मध्ये ही दुर्घटना घडली असून यामध्ये सूर्यभान काकड (६०) उषा काकड (५६) हे दाम्पत्य राहत होते. हे दांपत्य झोपेतच असताना हा प्रकार घडल्याने घराच्या ढिगाऱ्यखाली दोघेही जण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करत दोघाही पती पत्नीला ढिगाऱ्यखालून बाहेर काढलं. आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारादरम्यान सूर्यकांत काकड यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

दरम्यान या दुर्घटनेचा फटका आजूबाजूच्या घरांनाही बसला. या घराला खेटून असलेल्या घरांचे जिने कोसळल्याने बाजूच्या घरातील नागरिकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.
तर हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची माहिती मिळू शकली नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा