Home ठळक बातम्या डोंबिवलीत 60 हजार पुस्तकांतून साकारली प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती

डोंबिवलीत 60 हजार पुस्तकांतून साकारली प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती

डोंबिवली दि.19 जानेवारी:

खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन , डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील संतश्रेष्ठ वैकुंठवासी ह.भ. प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात पुस्तकांच्या माध्यमातून प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले.

येथील बंदिस्त क्रिडा संकुलात आयोजित या उपक्रमासाठी 62 हजार 500 पुस्तकांपासून तब्बल 50 फूट लांब आणि 80 फूट रुंद इतकी ही भव्य ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या भव्य प्रतिकृतीसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. 19 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत हे मंदिर नागरिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा