Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेत आता 22 रस्त्यांवर नो पार्किंग, तर 15 ठिकाणी पी1-पी2 नियम

कल्याण पश्चिमेत आता 22 रस्त्यांवर नो पार्किंग, तर 15 ठिकाणी पी1-पी2 नियम

ट्रॅफिक पोलिसांकडून पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना

कल्याण दि.17 जानेवारी :
प्रचंड संख्येने वाढलेली वाहने, या वाहनांना सामावून घेण्यासाठी तोकडे पडणारे रस्ते आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांची होत असलेली दमछाक. या सर्व पार्श्वभूमीवर ही समस्या सोडवण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कल्याण पश्चिमेतील वर्दळीच्या 22 रस्त्यांवर दोन्ही बाजूला नो पार्किंग तर 15 रस्त्यांवर पी 1 आणि पी 2 चे नियम लागू करण्यात आले आहेत. पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्त्वावर हे नियम लागू असतील अशी माहिती वाहतूक शाखेचे डीसीपी डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

कल्याण पश्चिमेला शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये, मोठी गृहसंकुले, मॉल आदी ठिकाणी दररोज वाहनांच्या वर्दळीची संख्या प्रचंड मोठी आहे. परिणामी या परिसरात पार्किंगचा प्रश्नही दिवसेंदिवस जटील बनला असून असुरक्षितपणे वाहने उभी केल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभुमीवर वाहतूक डीसीपी कार्यालयाकडून पुढील 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना जारी केली आहे.

तसेच वाहन चालकांनी आपली वाहने कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरातील कपोते वाहन तळ किंवा अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्याचे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या 22 मार्गांवर असणार नो पार्किंग….

या 15 मार्गांवर पी 1 आणि पी 2 चे नियम लागू…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा