Home ठळक बातम्या कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ: उद्याच्या निकालाची उत्सूकता शिगेला

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ: उद्याच्या निकालाची उत्सूकता शिगेला

वाढीव मतदानाचा कोणाला होणार फायदा ?

कल्याण – भिवंडी दि.3 जून :
संपुर्ण देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच दोन दिवसांपुर्वी आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलने आहेत तर लोकांच्या संभ्रमात आणखीनच भर टाकली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर राज्यातील प्रमुख बिग फाईटपैकी एक असणाऱ्या कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उद्याच्या निकालाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहचली आहे. (Loksabha elections 2024 – Kalyan and Bhiwandi Lok Sabha constituencies: Eagerness for tomorrow’s results has set in)

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ हे महाराष्ट्रातील प्रमूख मतदारसंघांपैकी एक. कल्याण लोकसभेमध्ये सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उध्दव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर तर भिवंडी लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडणुक लढवणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे उभे ठाकले.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. विशेष म्हणजे या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाले असून कल्याण लोकसभेत 50.12 टक्के तर भिवंडी लोकसभेत 59.89 टक्के इतके मतदान झाले आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा आजवरचा इतिहास पाहता पहिल्यादांच इतक्या मोठ्या संख्येने मतदान झाले आहे. तर हजारो नागरीकाना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही. अन्यथा या दोन्ही ठिकाणच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आणखी घसघशीत वाढ झाली असती. तरीही पूर्वीपेक्षा अधिक झालेला हा वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडला आहे याचे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल.

कल्याण आणि भिवंडीमध्ये झालेल्या वाढीव मतदानाच्या आकडेवारीवर विविध राजकीय जाणकारांनी तर्क वितर्क लढवत आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. कारण दोन्हीकडील हे वाढीव मतदान ज्याच्या पारड्यात पडेल त्याच्याच गळ्यामध्ये विजयाची माळ पडेल असा विश्वास हे राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

 

भिवंडीत झालेले विधानसभानिहाय मतदान…(59.89टक्के)

  • भिवंडी ग्रामीण – 72.66 टक्के (3 लाख 23 हजार 978 पैकी 2 लाख 35 हजार 411 मतदारांचे मतदान)
  • भिवंडी पश्चिम – 55.17 (3 लाख 4 हजार 959 पैकी 1 लाख 68 हजार 245 मतदारांचे मतदान)
  • भिवंडी पूर्व – 49.87 (3 लाख 36 हजार 110 पैकी 1 लाख 67 हजार 615 मतदारांचे मतदान)
  • कल्याण वेस्ट – 52.98 (4 लाख 138 पैकी 2 लाख 11 हजार 983 मतदारांचे मतदान)
  • मुरबाड – 61.12 (4 लाख 42 हजार 922 पैकी 2 लाख 70 हजार 703 मतदारांचे मतदान)
  • शहापूर – 70.26 (2 लाख 79 हजार 137 पैकी 1 लाख 96 हजार 119 मतदारांचे मतदान)

 

कल्याण लोकसभेतील विधानसभानिहाय मतदान…(50.12 टक्के)

  • अंबरनाथ – 47.07 टक्के (3 लाख 53 हजार 554 पैकी 1 लाख 66 हजार 407 मतदारांचे मतदान)
  • उल्हासनगर – 51.10 (2 लाख 57 हजार 367 पैकी 1 लाख 31 हजार 505 मतदारांचे मतदान)
  • कल्याण पूर्व – 52.19 (2 लाख 99 हजार 380 पैकी 1 लाख 56 हजार 235 मतदारांचे मतदान)
  • डोंबिवली – 51.67 (2 लाख 75 हजार 110 पैकी 1 लाख 42 हजार 142 मतदारांचे मतदान)
  • कल्याण ग्रामीण – 51.01 (4 लाख 53 हजार 149 पैकी 2 लाख 31 हजार 162 मतदारांचे मतदान)
  • मुंब्रा कळवा – 48.72 (4 लाख 43 हजार 661पैकी 2 लाख 16 हजार 159 मतदारांचे मतदान)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा