Home कोरोना कोवीड रुग्णालयातील कोवीड योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा...

कोवीड रुग्णालयातील कोवीड योद्ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

डोंबिवली दि.14 मे :
गेल्या एक दिड वर्षांपासून असलेल्या कोवीडमूळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे घरदार विसरून कोवीडशी लढत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांचे कौतुक करण्यासाठी आज डोंबिवलीमध्ये आगळा वेगळा सोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोवीड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

आज अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण आज एकाच दिवशी आले आहेत. त्याचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित करत अनोख्या पद्धतीने साजरा केला. डोंबिवली पूर्वेतील वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलात असणाऱ्या कोवीड रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

कोवीड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून गेले दिड वर्ष काम करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना डोंबिवली शहरप्रमूख राजेश मोरे, राजेश कदम, दिपेश म्हात्रे, डॉ. राहुल घुले, राहुल लोंढे, महेश गायकवाड, अभिजित थरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा