Home राजकीय घडामोडी राष्ट्रवादीच्या डोंबिवली विधानसभेत वॉर्ड क्रमांक 58 च्या अध्यक्षपदी भरत गायकवाड

राष्ट्रवादीच्या डोंबिवली विधानसभेत वॉर्ड क्रमांक 58 च्या अध्यक्षपदी भरत गायकवाड

डोंबिवली दि.3 मे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डोंबिवली विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 58 च्या अध्यक्षपदी भरत रामदास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आणि कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्याबाबतचे नियुक्तीपत्रही भरत गायकवाड यांना देण्यात आले असून राष्ट्रवादी पक्षाचे विचार आणि ध्येय धोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कार्याध्यक्ष रमेश दिनकर संघटक मंगेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा