Home कोरोना डोंबिवली मेडीकल केमिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 111 जणांचे रक्तदान

डोंबिवली मेडीकल केमिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 111 जणांचे रक्तदान

 

डोंबिवली दि.3 मे :
ब्रह्मविद्या-योगविद्येच्या माध्यमातून आपण करोनावर नियंत्रण मिळवू शकतो आणि आपल्याला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमासाठी उत्साह निर्माण होतो असे मत अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशन, एफडीए आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल 111 जणांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ( Blood donation of 111 people in the blood donation camp organized by Dombivli Medical Chemists Association)

डोंबिवली येथील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. अन्न आणि औषध प्रशासनाचेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण मुंधडा यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. तर शिबिराचा समारोप ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या उपस्थिती करण्यात आले.

आजच्या परिस्थितीत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे नाव केमिस्ट संघटनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जीवनाची लाईफ स्टाईल एकप्रकारच्या जैविक युद्धामुळे बदलली आहे. आपण योग आणि ब्रह्म विद्याला आपलेसे करून घेतल्यास कोणतीही व्याधी आपल्याला जखडणार नाही असे मत जगन्नाथ शिंदे यांनी यावेळी मांडले.

तर अन्न-औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण मुंधडा म्हणाले की आजच्या परिस्थितीत रक्ताची नितांत गरज होती. त्यामूळे आशा प्रकारचे ब्लड कॅम्प प्रत्येक शहरात होणे गरजेचे आहे. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती सफल करण्यात डोंबिवली केमिस्टने दिलेले योगदान वाखाणण्याजोगे असल्याची कौतुकाची थापही त्यांनी दिली.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे प्रकल्प प्रमुख निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, खजिनदार राजेश कोरपे यांनी विशेष परिश्रम घेतले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा