Home ठळक बातम्या भिवंडी लोकसभा : निर्धार यात्रेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा मतदारांशी...

भिवंडी लोकसभा : निर्धार यात्रेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा मतदारांशी संवाद

भिवंडी दि.14 मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अशातच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी निर्धार यात्रेच्या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल दहा सभा घेत मतदारांशी संवाद साधला.

निलेश सांबरे हे विजय निर्धारयात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. ८ मे पासून सुरु झालेली ही निर्धारयात्रा १४ मे रोजी संपन्न होत आहे. या शेवटच्या टप्प्यात सांबरे यांनी कोन-गोवे नाका येथे पहिली सभा घेतली. या सभेत प्रस्थापित राजकारण्यांवर टीकेची झोड उठवत असतांना सांबरेंनी मतदारांना जात-पात, धर्म, वंश, परंपरा या सर्वांच्या पलिकडे जाऊन समाजाच्या भल्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचेही निलेश सांबरे यांनी सांगितले.

या सभेनंतर निलेश सांबरे यांनी आमणे, वंजारपट्टी, शेलार (बोराडपाडा), कांबे, टेंभवली, खारबाव, अंजूर फाटा, कोपर पाईपलाईन मार्ग आणि दिवे (हायवे) या ठिकाणी सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले आणि पुष्पवर्षाव करत नागरिकांनी सांबरे यांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केल्याचे दिसून आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा