Home ठळक बातम्या घाटकोपरसारखा प्रकार कल्याणात घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही – आमदार विश्वनाथ भोईर...

घाटकोपरसारखा प्रकार कल्याणात घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही – आमदार विश्वनाथ भोईर यांचा संतप्त इशारा

कल्याणातील महाकाय होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची केली मागणी

कल्याण दि.14 मे :
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर सगळीकडील महाकाय होर्डिंगचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्व होर्डिंगचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत कल्याणात अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.(If something like Ghatkopar happens in Kalyan, the officer will not be forgiven – MLA Vishwanath Bhoir’s angry warning)

घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारले आहेत, त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी. त्यांची तपासणी करावी, तसेच ही महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहेत.

तर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड या आयएएस अधिकारी असून त्यांचा इतर अधिकाऱ्यांवर वचक असणे आवश्यक आहे. कल्याणात उभारण्यात आलेल्या या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी इथल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे, त्यात कोणताही गलथानपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कल्याणात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि लोकांनीही त्यांना कुठे असा प्रकार आढळून आल्यास आपल्याला किंवा महापालिका प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा