Home ठळक बातम्या भिवंडी लोकसभा: अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंची उद्या कल्याणात विजय निर्धार सभा

भिवंडी लोकसभा: अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंची उद्या कल्याणात विजय निर्धार सभा

आमदार बच्चू कडू राहणार उपस्थित

कल्याण दि.16 मे :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी उद्या १७ मे रोजी कल्याणमध्ये विजय निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात होणाऱ्या या सभेला आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार असल्याची माहिती जिजाऊ संघटनेकडून देण्यात आली.(Bhiwandi Lok Sabha: Independent candidate Nilesh Sambaren’s vijay Nirdhar sabha in Kalyan tomorrow)

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही जाहीर पाठींबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्याला होणाऱ्या या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ मे रोजी निलेश सांबरे भिवंडी शहरामध्ये एक भव्य रोड शो आणि प्रचार सभा घेणार असल्याचे असल्याचे जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत.

भिवंडीतील रोड शो दुपारी १२ वाजता साईबाबा मंदिर बायपास, भिवंडी येथून सुरु होणार असून भादवड नका, नईबस्ती, कल्याण नाका, स्व. आनंद दिघे चौक, बस स्थानक, वंजारपट्टी नाका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काढण्यात येणार आहे. तर हा रोड शो संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार असल्याचे जिजाऊ संघटनेकडून सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा