Home ठळक बातम्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण; पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण,...

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण; पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण आदी मुद्द्यांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्र पाठवून खा. डॉ. शिंदे यांचे कौतुक

डोंबिवली दि.16 मे :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील पाच वर्षांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण जाणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभेत लोकल हे प्रवासाचे प्रमुख माध्यम असल्याने रेल्वे संबंधी सुविधा पुरविण्यावर भर देणार तसेच दळणवळणाचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण ते ठाणे कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे, उन्नत मार्ग, नवी मुंबई एअरपोर्टला थेट महामार्गांशी जोडणारा ऍक्सेस कंट्रोल मार्ग, महापे, शीळ ते रांजणोली उन्नत मार्ग, विठ्ठलवाडी शहाड उन्नत मार्ग असे काही गेमचेंजर प्रकल्प आगामी काळात केले जाणार असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभेत चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी उल्हासनगरमध्ये मोफत हॉस्पिटल सुरू झाले असून तिथे केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. अशाच प्रकारचे मोफत हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरू करणार असून कल्याण लोकसभेत एम्स हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर अंबरनाथ शहरातील यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षण केंद्राप्रमाणे इतर दोन ते तीन शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारणार असून सरकारी शाळा डिजिटल करून खासगी शाळांप्रमाणे चांगल्या दर्जाचे शिक्षण तिथे देण्यात येणार आहे. तर अंबरनाथमधील आयटीआयचे अपग्रेडेशन करून तरुणांना स्टार्टअपसाठी मदत व्हावी या हेतूने अंतार्ली गावात महाहब सुरू होत असून अंबरनाथ आणि डोंबिवलीत टाटा इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार आहे. तर कल्याण लोकसभेतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू, पोशीर या नद्यांवर धरण उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खा.शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमूख उपस्थितीत काल कल्याणात महाविजय संकल्प सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा क्षेत्रात खासदार डॉ. शिंदेकडून झालेल्या कामाबाबत कौतुकाची थापही दिली आहे. तसेच केंद्रातील विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून खा. डॉ. शिंदे यांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे डॉ. श्रीकांत शिंदेही निवडून आल्यावर काम करतील – आमदार राजू पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे पुढील 100 दिवसांचे कामाचे प्लॅनिंग केले आहे. त्याच धर्तीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही प्राथमिकतेनुसार काम करतील असा विश्वास मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गेल्या दहा वर्षात खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली विकासकामे कोणीही नाकारू शकणार नाही. आम्हीही विकासकामांबाबत त्यांना सूचना करणार असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी – राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंद परांजपे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत लोकसभा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा केलेला विकास पाहता त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी असे मत यावेळी राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी यावेळी व्यक्त केले. खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे असेल, रस्ते असेल, उड्डाणपूल असतील, या सर्वांच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केल्याचेही आनंद परांजपे यावेळी म्हणाले.

खा. डॉ. शिंदे यांच्याकडून लहान लहान प्रश्नही सोडविण्याचे काम – भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी

गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून देश पातळीवरील मुद्द्यांसोबत मतदारसंघातील लहान लहान प्रश्न सोडविण्याचे कामही झाल्याची भावना यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केली. मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न असो, शिवमंदिर कॉरीडोर असो अशा सर्वच कामांना डॉ. शिंदे यांनी न्याय देण्याचे काम केल्याचे सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संकल्पपत्राची ठळक वैशिष्ट्ये…

गेमचेंजर प्रकल्प..
कल्याण ते ठाणे कोस्टल रोड ,
मतदारसंघातील सर्व शहरात मेट्रोचे जाळे,
एक्सेस कंट्रोल मार्ग
कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प,
जलवाहतूक,

रेल्वे – रस्ते
मतदारसंघात उन्नत मार्गांची उभारणी,
विविध ठिकाणी उड्डाणपुलाचे जाळे,
उन्नत मार्गांची उभारणी,
भूमिगत वाहनतळ आणि बहुमजली वाहन तळ उभारणी,
रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या मर्गिकेला गती,
दातीवली स्थानकाला पूर्ण स्थानकाच्या दर्जासाठी प्रयत्न
दिवा वसई मार्गावर लोकल गाड्या
कल्याण पनवेल लोकल सेवा,
कल्याण कर्जत, कल्याण कसारा शटल सेवा.

आरोग्य..
एम्सच्या धर्तीवर रुग्णालय उभारणार,
प्रत्येक शहरात सुपर स्पेशालिटी मोफत हॉस्पिटल उभारणी,
शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सोयी सुविधांची उभारणी,

महिला – दीव्यांग – दृष्टीहिनांचे सक्षमीकरण
केजी ते पिजी शिक्षणाची हमी
युपीएससी आणि एमपीएससी केंद्रांची उभारणी,
कल्याण आणि अंबरनाथमध्ये टाटाचे कौशल्य संवर्धन केंद्र
स्टार्ट अप उभारणीसाठी महाहाबची उभारणी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार
रेल्वेच्या घरात वास्तव्यास असलेल्या घरांच्या पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार
बालेवडीच्या धर्तीवर स्पोर्ट्स अकादमी
ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी
मतदारसंघातील अध्यात्मिक आणि धार्मिक ठिकाणांचे जतन
कल्याणात खाडी किनारी वॉटर फ्रंट विकसित करणार
मतदारसंघासाठी स्वतंत्र धरणं प्रयत्न करणार
एकात्मिक शासकीय कार्यालयाची निर्मिती
पर्यावरण रक्षणासाठी विशेष लक्ष

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा