Home क्राइम वॉच भोपाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आंबिवलीच्या इराणी वस्तीतून जेरबंद; खडकपाडा पोलिसांची कारवाई

भोपाळचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आंबिवलीच्या इराणी वस्तीतून जेरबंद; खडकपाडा पोलिसांची कारवाई

 

कल्याण दि.7 एप्रिल :
कल्याणनजीक असलेल्या आंबिवली परिसरातील इराणी वस्ती म्हणजे चैन स्नेचर्सची राजधानी अशी कुप्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ पोलीसांच्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराच्या खडकपाडा पोलिसांनी याच इराणी वस्तीतून मुसक्या आवळल्या आहेत. त्यामूळे आता ही वस्ती इतर राज्यातील गुन्हेगारांचेही आश्रयस्थान बनू लागली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाफर उर्फ चौहान युसूफ जाफरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भोपाळच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपवर भोपाळ पोलिसांनी 10 हजारांचे बक्षीसही ठेवले होते. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर, हवालदार जितेंद्र ठोके, विनोद चन्ने दिपक थोरात, अशोक आहेर, सुरेश बडे आणि राजाराम गमणे या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली.

दरम्यान आंबिवलीतील इराणी वस्ती आणि चैन स्नॅचर्स यांचे जणू अतूट नाते आहे. अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवरही याठिकाणी अनेक वेळा हल्ले झाले आहेत. या वस्तीमध्ये राहणाऱ्या चोरट्यानी कल्याण डोंबिवलीच नव्हे तर ठाणे, मुंबई,नवी मुंबईसह राज्यातील अनेक शहरात धुडगूस घातला होता. काही गुन्हेगारांनी तर राज्याबाहेर देखील आपले गुन्ह्याचे जाळे पसरवले होते. तसेच चोरट्याना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर अनेकदा या वस्तीतील चोरटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हल्ले झाल्याची घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खडकपाडा पोलिसांनी सप्टेंबर 2020 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत 19 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 4 आरोपी हे मध्यप्रदेश, हरयाणा आणि कर्नाटकातील आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा