Home ठळक बातम्या क्या बात है : पर्यावरण दिनानिमित्त कल्याणात साजरा झाला झाडांचा वाढदिवस

क्या बात है : पर्यावरण दिनानिमित्त कल्याणात साजरा झाला झाडांचा वाढदिवस

 

कल्याण दि.6 जून :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये चक्क झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.अनुबंध या सामाजिक संस्थेतर्फे हा अनोखा उपक्रम राबवून कल्याण पश्चिमेच्या आदिवासी वाडीतील लहान मुलं आणि त्यांच्या पालकांमध्ये पर्यावरण रक्षण याविषयी जनजागृती करण्यात आली. (Birthday of trees was celebrated in Kalyan on the occasion of Environment Day)

बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनी अनुबंध संस्थेने इथल्या मुलांना प्रेरित करून विविध औषधी वृक्षांचा वृक्षांची लागवड लहान मुलांकडून करून घेतली. प्रत्येक मुलाला एक झाड लावण्याची जबाबदारी देत त्या झाडाचे संगोपन करायची जबाबदारीही या मुलांवर सोपविण्यात आली. आणि या मुलांनीही आपल्या लहान भावा बहिणीप्रमाणे या आपल्या निसर्ग मित्राची आणि काळजी घेतली लावून आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. त्याचे निमित्त साधून अनुबंध समस्यांना या मुलांनी लावलेल्या प्रत्येक झाडाचा वाढदिवस साजरा करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलेला पाहिला मिळाला. या प्रत्येक झाडाच्या समोर आज माझा वाढदिवस या आशयाची पाटी लावून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अशा अनोख्या पद्धतीनं अनुबंध संस्थेने या निसर्गाचे रक्षण करण्याचा माध्यमातून लहान मुलांमध्येही निसर्गाविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयी गोडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती अनुबंध संस्थेच्या विशाल जाधव यांनी दिली. अनुबंध संस्थेच्या प्रयत्नाचे कौतुक करावं तेवढं कमीच ठरेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा