Home ठळक बातम्या हॅपी स्ट्रीट : कल्याणात पोलिसांच्या बॉलिंगवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी

हॅपी स्ट्रीट : कल्याणात पोलिसांच्या बॉलिंगवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची फटकेबाजी

हॅपी स्ट्रीटला भेट देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेनीही लुटला आनंद

कल्याण दि. ५ जून :

एकीकडे राजकारणाच्या पिचवर आपल्या विकासाभिमुख खेळीच्या माध्यमातुन विरोधकांना घाम फोडलेल्या शिवसेनेच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी क्रिकेटच्या पीचवरही आपण तितक्याच आत्मविश्वासाने उभे राहू शकतो हे दाखवून दिले. निमित्त होते ते कल्याणात पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे. यावेळी पोलिसांनी केलेल्या बॉलिंगवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चांगलीच फटकेबाजी केलेली पाहायला मिळाले.

मुंबई, नागपूर, ठाणे शहराच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली शहरातील देखील नागरिकांना मोकळा आनंदी श्वास घेता यावा, त्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यााठी कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने हॅपी स्ट्रीटची संकल्पना राबविण्यात आली आहे. प्रत्येक रविवारी कल्याण वायले नगर, वसंत व्हॅली तर डोंबिवली फडके रोड येथे सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. आजदेखील कल्याणात हॅपी स्ट्रीट वर नागरिकांनी मोठी गर्दी करत रॅपलिंग ,योगासनं,आर्चेरी , क्रिकेट, स्केटिंग , फुटबॉल , स्केटिंगसह झुंबा डान्स ,सिंगिंग उपक्रमात सहभाग घेतला.

विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील या हॅप्पी स्ट्रीटवर हजेरी लावत अन्य उपक्रमांसह क्रिकेटचा आनंद लुटला. क्रिकेटचा केवळ आनंदच लुटला नाही तर यावेळी पोलीसांनी केलेल्या बॉलिंगवर खासदार डॉ. शिंदे यांनी चांगलीच फटकेबाजीही केलेली पाहायला मिळाले. त्यासोबतच लगोरी स्लेज हॅमर, बॅटल रोप या व्यायामाच्या प्रकारांचाही खासदार डॉ. शिंदे यांनी मनमुराद आनंद लुटला.

पोलिस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र अशाप्रकारे एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन पोलिसांनी केलाय हे पहिल्यांदाच घडल असेल असे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शहरात वेगवेगळ्या भागात हा उपक्रम सुरू करावा अशी सूचनाही त्यांनी मांडली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा