गुलाल उधळून पेढे वाटून साजरा केला आनंद
कल्याण दि.११ जून :
राज्यसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा झालेला विजय कल्याणात भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे साजरा केलेला पाहायला मिळाला. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
लोकांच्या मनामध्ये जे होते ते काल महाराष्ट्रात झालं असून लोकांच्या मनातला निर्णय झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत महापौर भाजपचाच महापौर बसणार यात तिळमात्र शंका नसल्याचे मत जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच जनता या सरकारला पूर्णपणे कंटाळली आहे. हे सरकार म्हणजे अस्ताव्यस्त सरकार असून केवळ सरकार वाचवण्यासाठी यांची धडपड सुरू असते. हे जनतेला आता लक्षात आले असून आगामी कल्याण डोंबिवली निवडणूकीत भाजपचा महापौर होणार हे शंभर टक्के असा दावाही शशिकांत कांबळे यांनी केला.
यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक मनोज राय, सौरभ गणात्रा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.