Home ठळक बातम्या महापालिका असो, विधानसभा असो की लोकसभा निवडणूक, आता विजय भाजपचाच – केंद्रीय...

महापालिका असो, विधानसभा असो की लोकसभा निवडणूक, आता विजय भाजपचाच – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

राज्यात शरद पवारांनंतर देवेंद फडणवीस हेच लोकनेते

कल्याण दि. 12 जून :
राज्यातील आघाडी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून येणाऱ्या महापालिका निवडणुका असो की लोकसभा-विधानसभा. त्यामध्ये आता जनता ठामपणे भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभी राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघटनेशी संवाद साधला. (Whether it is municipal elections, assembly or Lok Sabha, now the victory belongs to BJP – Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil)

ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात, सरपंच ते केंद्रीय मंत्री हा प्रवास, राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी,आगामी महापालिका निवडणुका, शिवसेना – भाजप संबंध, नेवाळी आंदोलन, लोकनेते दि. बा. पाटील नामकरण, ओबीसी आरक्षण यांच्यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर दिलखुलासपणे आपली मते मांडली. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे,माजी नगरसेवक वरुण पाटील, विक्की गणात्रा, दिपक ब्रीद आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

राज्य सरकारला महागाई कमी करण्यापेक्षा लोकांची दिशाभूल करण्यात स्वारस्य…
आपल्याला राज्यात जी परिस्थिती दाखवली जात आहे. तसे काही खरोखर आहे का? जनतेसाठी राज्य सरकारकडे संवेदना असती तर त्यांनी पेट्रोल डिझेल दर कमी केले असते. राज्य सरकारला महागाई कमी करण्यात नाही तर लोकांची दिशाभूल करण्यात स्वारस्य आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता 100 टक्के भाजपच्या पाठीशी उभी राहणार असा ठाम विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच लोकनेते…
देवेंद फडणवीस आज मुख्यमंत्री नाहीयेत. तरीही लोकं त्यांच्या पाठीमागे पळत असतात. आपण तर केंद्रात मंत्री असूनही आम्ही ज्या कार्यक्रमात एकत्र असतो. तिकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सर्वाधिक गर्दी असते एवढी त्यांची लोकप्रियता आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांत जे काम केले, त्यातूनच त्यांनी आपली ही जी प्रतिमा बनवली असून जनतेच्या विश्वासामुळेच हे झाले आहे. राज्यामध्ये एक शरद पवार असे नेते आहेत की ज्यांच्याकडे कुठलेही पद नसेल तरी त्यांचा मान सन्मान तसाच आहे. त्यांच्यानंतर राज्यामध्ये कोणी तयार झाले असेल तर ते देवेंद्र फडणवीस असून आम्हाला त्याचा अभिमान असल्याची भावनाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार 100 टक्के निवडून येणार…
राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला अवघ्या एक टक्के मतांची आवश्यकता आहे. मोदींजीच्या (narendra modi) नेतृत्वाखाली भाजप कुठूनही कोणाचेही मत परिवर्तन करू शकते. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत (president election) भाजपचा (bjp) उमेदवार १०० टक्के निवडून येणार असल्याचा विश्वासही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटजीचा विजय…
राज्यसभा निवडणुक निकलानंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आमच्या हातात इडी असती तर आम्हाला ही मतं मिळाली असती असे वक्तव्य केले. मग संजय राऊत यांना इडीमुळे मते मिळाली का ? असा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित करत राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटजीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी आणि निवडणुक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. स्वतःची हार कुणाच्यातरी पाठीमागे लपवण्याचे काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणार. यामध्ये ईडीचा प्रश्न आला कुठून ,त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टाने सुद्धा मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्ट सुद्धा इडीच्या सांगण्यावरून चालतं का ? असा सवालही कपिल पाटील यांनी यावेळी केला.

आघाडी सरकारकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणण्याचं काम…

राज्यसभा निवडणूक निकालानंतर महविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू अस वक्तव्य केले आहे त्यावर केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील म्हणाले यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणारे मंत्री आहे विधान परिषदेत भाजपचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सहाय्य करतील असा याचा अर्थ आहे. राज्यसभा निवडणुकीत जी काही मतं भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या आमदरांची होती. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आणखी आमदार आमच्या बाजूने येत मतदान करतील ,अपक्ष आमदारावर दबाव आणण्याचं काम आघाडी सरकारचा सुरू आहे. देशात लोकशाही आहे राज्यात लोकशाही आहे की नाही याबाबत विचार करावा लागेल ,आघाडी सरकारमधील मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ते दुर्दैव आहे. अपक्ष आमदार या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपाला मतदान करतील असे पाटील यांनी नमूद केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा