Home ठळक बातम्या कल्याणात पल्सरमेनियामध्ये बाईक रायडर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके

कल्याणात पल्सरमेनियामध्ये बाईक रायडर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके

कृष्णा मोटर्स आणि बजाज ऑटोच्या माध्यमातून आयोजन

कल्याण दि.1 फेब्रुवारी :
गेल्या काही वर्षांत बाईक आणि तरुणाई यांचं काहीसं अतूट असे नाते निर्माण झाले आहे. कल्याणात पहिल्यांदाच आयोजित एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून तरुणाई आणि बाईकच्या वेडाचे हे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. निमित्त होते ते उल्हासनगरमधील कृष्णा मोटर्स आणि बजाज ऑटो लिमिटेडच्या माध्यमातून आयोजित पल्सरमेनिया कार्यक्रमाचे. यामध्ये प्रशिक्षित आणि तज्ञ बाईक रायडर्सनी मॅक्सी ग्राऊंडवर सादर केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी युवा वर्गाची मोठी गर्दी झाली होती.

गेल्या दोन दशकांत आपल्याकडे बाईक वापरणाऱ्या लोकांची संख्या लक्षणियरित्या वाढली आहे. विशेषतः युवकांचा अधिक कल वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या वेगवान बाईक खरेदी करण्याकडे असल्याचे दिसत आहे. युवा वर्गमधील हे बाईकवेड पाहता बाईक बनवणाऱ्या कंपन्यांनीही वेगवान आणि तितक्याच सुरक्षित बाईक बनवण्यावर भर दिला आहे.

या पार्श्वभुमीवर बाईकनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ऑटो आणि उल्हासनगरमधील कृष्णा मोटर्सच्या माध्यमातून कल्याणात प्रथमच अनोखा बजाज पल्सर बाईक स्टंटशो आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भारतातील दिग्गज प्रोफेशनल स्टंट बाईक रायडर्स सहभागी झाले होते. ज्यांनी अतिशय कौशल्यबद्ध मात्र तितकेच एकाहून एक जबरदस्त असे स्टंट दाखवत उपस्थितांची वाहवा मिळवली. ज्यामध्ये कल्याणकरांना व्हिली, स्टॉपी , ॲक्रोबॅटिक्स, बर्न आऊटसारखी चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवायला मिळाली.

हे स्टंट सादर करणारे सर्व रायडर्स हे प्रोफेशनल रायडर्स असून त्यांनी या स्टंटसाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतले आहे. आमच्याकडून निर्मिती होणाऱ्या बाईक्समध्ये रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी कशाप्रकारे अधिकाधिक भर देण्यात आला आहे याची लोकांना माहिती करून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी कृष्णा मोटर्सचे विनय नागवानी, गिरीश चौधरी, बजाज ऑटो महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर देवी दत्त, मुंबई विभागाचे सेल्स मॅनेजर आदर्श सूराना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा