Home Uncategorised कल्याणचा विकास दिसत नाहीये ? डोळे खराब असतील तर चष्मा बदला –...

कल्याणचा विकास दिसत नाहीये ? डोळे खराब असतील तर चष्मा बदला – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंचे नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर

कल्याण दि.13 एप्रिल :
एवढा विकास होऊनही कोणाला कल्याण शहर मागास आहे असे वाटत असेल तर बहुधा त्यांचे डोळे खराब असतील, त्यांनी आपला चष्मा बदलावा असा पलटवार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी कल्याण पश्चिमेतील आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नावरून टीका केली होती. त्या टिकले केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Can’t see the development of Kalyan? If your eyes are bad, change your glasses – Union Minister of State for Panchayat Raj, Kapil Patil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने खऱ्या अर्थाने कल्याण शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेले रस्ते असो, महाराष्ट्रात कुठेही नसेल इतके मोठे सिटी पार्क असो, सुसज्ज पे अँड पार्क असो, सीसीटीव्हींचे जाळे असो, रिंगरोडचे काम, पाणीपुरवठा योजना असो की दुर्गाडी पुलाचे काम. केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून ही सर्व कामे कल्याण पश्चिमेत झालेली आहेत. असे असताना ज्यांचे डोळे खराब असतील त्यांनाच हा विकास दिसू शकत नाही, त्यांनी आपला चष्मा बदलावा असा टोला लगावत एवढा विकास होऊनही कोणाला असं वाटत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट असल्याचे कपिल पाटील नाव न घेता म्हणाले.

भिवंडी लोकसभेत कधीही जातीचे राजकारण झाले नाही…

भिवंडी लोकसभा, संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हा मोदीमय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाच्या आधारावर इथली जनता आपल्याला भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर भिवंडी लोकसभेत कधीही जातीचे राजकारण झाले नाही, ज्या लोकांना अशा कुबड्या लागतात तेच असं बोलतात. आम्ही विकासाचे राजकारण करत आहोत. सगळे जणं विकासासाठी मतदान करणार असून देशात केवळ युवा महिला शेतकरी आणि गरीब या चारच जाती असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा