Home ठळक बातम्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यासह शिवसेना संपवण्याचे काम – भाजप महाराष्ट्र...

संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यासह शिवसेना संपवण्याचे काम – भाजप महाराष्ट्र प्रभारी डॉ. दिनेश शर्मा

केवळ महाराष्ट्रत नव्हे तर संपूर्ण देशात मोदी लाट

कल्याण दि.13 एप्रिल :
खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाच तिलांजली देण्यासह शिवसेना संपवण्याचे काम केल्याचा घणाघात भाजपचे महाराष्ट्र लोकसभा प्रभारी खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी केला आहे. कल्याण पश्चिमेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Sanjay Raut’s work to end Shiv Sena along with Balasaheb’s thoughts – BJP Maharashtra in-charge Dr. Dinesh Sharma)

आपण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22 लोकसभा मतदारसंघ फिरलो आहोत. या सर्व ठिकाणी आम्हाला लोकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. यंदाची निवडणूक ही राजकीय पक्ष नव्हे तर देशातील जनताच लढवत आहे. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात मोदी लाट असून विरोधकांना एक जागा जरी जिंकता आली तरी मोठी गोष्ट असेल असा विश्वास डॉ. शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

उध्दव ठाकरे यांनी आपल्या चेहऱ्यावरील खोटा मुखवटा दूर…
उध्दव ठाकरे यांनी आपल्या चेहऱ्यावरील प्रभू श्रीराम, हिंदुत्व आणि सनातनचा खोटा मुखवटा दूर केला आहे. त्यामुळेच ते प्रभू श्रीराम आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध करणाऱ्या, सतत नकारात्मक विचार करणाऱ्या, मोदी विरोध करणाऱ्या, मोदींना अपशब्द बोलणाऱ्या काँग्रेससोबत गेल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक…
राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले असून बाळासाहेबांच्या विचारधारेची त्यांना जाण आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की बाळासाहेबांची स्वप्नं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेने मनापासून मोदींना समर्थन दिलं असून आपण त्यांचे मनापासून त्यांचे आभार मानत असल्याचेही खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी सांगितले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील, मोहने टिटवाळा अध्यक्ष शक्तिवान भोईर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा