Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतींचा उत्साह ; अभिवादनासाठी मोठी गर्दी

कल्याण डोंबिवलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतींचा उत्साह ; अभिवादनासाठी मोठी गर्दी

कल्याण पूर्वेतील नव्या स्मारक परिसरात लोटला जनसागर

कल्याण डोंबिवली दि.14 एप्रिल :
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीचा कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा असा उत्साह दिसून येत आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी काल रात्री 12 वाजता कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातही विशेषतः काही आठवड्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मोठा जनसागर लोटला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती असली तरी गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये त्याचा उत्साह जाणवत आहे. कल्याणमध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात तर डोंबिवलीमध्ये इंदिरा गांधी चौकात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काल रात्री अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. ज्यामध्ये आबाल वृद्धांसह महिला, युवक – युवतींची संख्याही लक्षणीय होती.

नुकत्याच लोकार्पण झालेल्या स्मारक परिसरात लोटला जनसागर…
दरम्यान कल्याणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सर्वाधिक उत्साह जाणवला तो कल्याण पूर्वेतील नुकत्याच लोकार्पण झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारक परिसरात. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ड प्रभाग परिसरात हे भव्य स्मारक साकारण्यात आले असून याठिकाणी हजारो नागरिक आणि अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्राला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे, सुमेध हुमणे, भारत सोनवणे, उदय रसाळ यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांना खासदार डॉ. शिंदे यांनी शुभेच्छा देत आपल्या सर्वांच्या मेहनतीने आणि पाठपुराव्यामुळे कल्याण शहरात हे अतिशय देखणे आणि भव्य स्मारक उभे राहिल्याचे मत व्यक्त केले. तसेच आपल्याला या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान असून हे स्मारक येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे, प्रशांत काळे, नवीन गवळी, मल्लेश शेट्टी, अर्जुन पाटील यांच्यासह स्मारक समितीचे अण्णा रोकडे, सुमेध हुमणे, भारत सोनवणे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा