Home ठळक बातम्या ‘अनुभूती’च्या बालवैज्ञानिकांनी कल्याणात अनोख्या पध्दतीने साजरा केला ‘विज्ञान दिन’

‘अनुभूती’च्या बालवैज्ञानिकांनी कल्याणात अनोख्या पध्दतीने साजरा केला ‘विज्ञान दिन’

कल्याण दि.4 मार्च :
कल्याणातील अनुभूती बालवाचक कट्ट्याने राष्ट्रीय विज्ञान दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला. खडकपाडा येथील निसर्गरम्य साई उद्यानात विज्ञान दिनानिमित्त (science day) बालवैज्ञानिकांनी (child scientist) आपल्या जीवनातील विज्ञानाचे महत्व समजावून दिले.

भारताला पहिला ‘नोबेल पुरस्कार’ (India’s first noble award) मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ‘रमण – परिणाम’ (Raman Effect) हा शोध निबंध ज्यादिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी जगासमोर मांडला तो दिवस आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय न राहता त्याच्यातील औत्सुक्याचा, कुतुहलाच्या गोष्टी मुलांना रोचकपणे कळाव्या या हेतूने अनुभूती बाल वाचक कट्ट्यातर्फे या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.

रिया बऱ्हाटेने ‘रमण – प्रभावा’विषयी सांगून कार्यक्रमाची सुरवात केली. चुणचुणीत मृण्मयी जोशी आणि तिथी साळी ह्यांनी सौरमंडल, चैताली क्षीरसागरने ग्रहण, वेदांत थोरात यांनी कृष्ण विवर तर छोट्या गोड जान्हवीने यावेळी ज्वालामुखीचा प्रयोग करून दाखविला. सोहम बिडगर आणि आयुष यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारे लहानसे नाट्य सादर करून कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. तर पुराण आणि विज्ञान यांची सांगड घालून देणाऱ्या लेखाचे उत्तम वाचन प्राजक्ता जोशीने केले. श्रोत्यांमधून पूर्वा विश्वासने इंद्रवज्रााची आश्चर्यकारक माहिती सांगितली.

प्रसाद सोमण, अचला डोंगरे यांनी आपल्या आपल्या सूत्रसंचलनातून विज्ञानाचे आपल्या आयुष्यातील महत्व समजावले. प्रणिता चितापुरकर हीच्या विज्ञान दिन साजरा करण्याची संकल्पना सगळ्यांनी उचलून धरली. तर विज्ञान दिनासारखे विविध उपक्रम राबवून वाचन संस्कृती जोपासायचा, रुजवायचा प्रयत्न करत असल्याची माहिती अनुभूती वाचक मैफील संस्थेच्या शुभांगी ओतुरकर यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा