Home कोरोना कोरोना प्रादुर्भाव ; कल्याण डोंबिवलीत होळी आणि रंगपंचमीवर केडीएमसीकडून निर्बंध

कोरोना प्रादुर्भाव ; कल्याण डोंबिवलीत होळी आणि रंगपंचमीवर केडीएमसीकडून निर्बंध

कल्याण – डोंबिवली दि.24 मार्च :
कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा रेकॉर्डब्रेक आकडा पाहता केडीएमसीकडून कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवसांवर आलेल्या होळी आणि धुलीवंदन-रंगपंचमी साजरा करण्यास केडीएमसीकडून मनाई करण्यात आली आहे. येत्या 28 मार्च रोजी रविवारी होळी तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 29 मार्च रोजी रंगपंचमी आहे.

मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी हे दोन्ही सण खासगी किंवा सार्वजनिक जागेमध्ये साजरे करण्यावर पालिका प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मी जबाबदार मोहिमेंतर्गत वैयक्तीकरित्याही शक्यतो हा उत्सव साजरा न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा