Home ठळक बातम्या डेडलाईन संपली,आता आमच्याकडे दुर्लक्ष करा : मनसेच्या या बॅनरने फोडला पालिकेला घाम

डेडलाईन संपली,आता आमच्याकडे दुर्लक्ष करा : मनसेच्या या बॅनरने फोडला पालिकेला घाम

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

डोंबिवली दि.29 मार्च :
डोंबिवली स्टेशन परिसरात मनसेने लावलेल्या एका बॅनरने केडीएमसी प्रशासनाची धाकधूक वाढवली आहे. “डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी देण्यात आलेली डेड लाईन संपली आहे. त्यामुळे आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ” या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. डोंबिवली पूर्व परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न आता आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असा थेट इशाराच मनसेने या बॅनरद्वारे केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.

डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांवरील कारवाईच्या मुद्द्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी केडीएमसी प्रशासनाची भेट घेतली होती. त्यावेळी केडीएमसी प्रशासनाने या फेरीवाल्यांवर दोन आठवड्यात कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने हा प्रश्न हाताळेल असे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला सांगितले होते. मनसे आमदारांच्या या भेटीनंतर लगेचच केडीएमसी प्रशासनाने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करत मनसे आमदारांच्या या मागणीला त्वरित प्रतिसाद दिल्याचे दाखवले.

परंतू केडीएमसी प्रशासनाकडून ही केवळ दिखाव्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगत महापालिका आयुक्त हे चांगले काम करत आहेत. परंतु त्यांच्या हाताखालील अधिकारी त्यांची दिशाभूल करत असल्याची टीका मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केली. तसेच महापालिका अधिकारी या फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत असल्यानेच त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तर आम्ही केडीएमसी प्रशासनाला १५ दिवसांची पुरेशी मुदत दिली होती. ती मंगळवारी संपली असून केडीएमसी प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई न झाल्याने आजपासून आम्ही आमच्या पद्धतीने हा प्रश्न हाताळू असा थेट इशारा मनसेने दिला आहे.

तर या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील हे आज बुधवारी सकाळी डोंबिवली पूर्व स्टेशन परिसराची पाहणी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीत मनसेचे खळखट्ट्यक स्टाईल आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा