Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेमध्ये विकासकामांचा अश्वमेध असाच सुरू राहणार – आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण पश्चिमेमध्ये विकासकामांचा अश्वमेध असाच सुरू राहणार – आमदार विश्वनाथ भोईर

प्रभाग क्रमांक २६ मध्ये दिड कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

कल्याण दि.11 सप्टेंबर :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा अश्वमेध असाच सुरू राहील असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक -26 मध्ये आमदार विशेष निधीतून मंजूर विकासकामांचे भूमीपूजन आमदार भोईर यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

कल्याण पश्चिमेच्या विविध प्रभागांत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून अनेक विकासकामे राबवली जात आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर वैजयंती घोलप-गुजर यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक 26 मध्ये ही विकासकामे केली जाणार आहेत. आमदार भोईर यांच्या निधीतून या प्रभागात विठोबा कृपा येथे रस्ता आणि स्लॅबसह नाला बांधणे, अभिषेक कल्पेश सोसायटीत रस्ता काँक्रीट करणे, दशरथ व्हिला ते गणपती मंदिर रोड गटार बनविणे आणि बलाका राजेश्वरी सोसायटी येथील नाल्यावर स्लॅब टाकणे अशा अंदाजित 1 कोटी 50 लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा त्यात समावेश आहे.

या भूमीपूजन समारंभाला माजी महापौर वैजयंती गुजर (घोलप), उपशहर प्रमुख नरेंद्र कामत, विभागप्रमुख अरुण कदम, शाखाप्रमुख प्रशांत पाटील, शाखा अधिकारी मंदार बेलोटे, उपविभाग प्रमुख गणेश खानविलकर, विभाग संघटक वैशाली घोलप तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा