Home ठळक बातम्या जे मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्याना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले –...

जे मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्याना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

भाजप नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी उभा

कल्याण दि.3 सप्टेंबर :
महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा समाजाचे इतके मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले असल्याची भावना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. जालन्यातील घटनेनंतर विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. त्यावर कल्याण पश्चिमेत शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आयोजीत केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मंत्री कपिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Fadnavis has done what no Chief Minister of the Maratha community has been able to do – Union Minister Kapil Patil)

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना…
मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजेत ही सर्वपक्षीयांची भावना होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणही दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने ते कोर्टाने रद्द केले असून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी अताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही कपिल पाटील म्हणाले. जालन्यात काल घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी असून त्याचे कोणीही राजकारण कोणीही करू नये. जे लोकं कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कधीही बोलले नाहीत, असे लोकही आता तिकडे जाऊन मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत असल्याची टीकाही कपिल पाटील यांनी यावेळी विरोधकांचे नाव न घेता केली.
तर मराठा समाजाबाबत भारतीय जनता पक्षाच्या अतिशय सकारात्मक भावना आहेत. भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. उलट आतापर्यंत एवढे मराठा मुख्यमंत्री झाले असतील, त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल असल्याची भावना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणाच्याही असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही – कथोरे वादावर पाटील यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्ष हा पक्ष म्हणून काम करतो. कोणत्याही व्यक्तीची ताकद नसून कपिल पाटील यांच्या पाठीमागून भाजप वजा केली तर कपिल पाटील यांची किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे कोणीही असे समजण्याचे कारण नाही की तो आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आहे तर ते नंदनवनात वावरतात. कोणाच्याही काहीही केल्याने काही कोणाला फरक पडत नाही. मोदींचे नेतृत्व जगाने तर देवेंद्रजींचे नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे. त्यांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या बळावर भाजप उमेदवाराला मते मिळतील. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभेत कुठेही कोणाच्या असण्याने नसण्याने काहीही फरक पडत नाही. 2014 ला ते होते कुठे, तेव्हाही भारतीय जनता पक्षाचाच विजय झालेला आहे असे सांगत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांचे नाव न घेता टोमणा मारला.

या कार्यकर्ता मेळाव्याला ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमूख नरेंद्र पवार, शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा