Home ठळक बातम्या मराठा क्रांती मोर्चातर्फे कल्याण बंदची हाक ; अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी सहभागी...

मराठा क्रांती मोर्चातर्फे कल्याण बंदची हाक ; अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

कल्याण दि.4 सप्टेंबर :

जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोचातर्फे आज कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांनी या बंदला सहकार्य करण्याचे आवाहनही मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा समाजाच्या आरक्षणादरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी याविरोधात निदर्शने आणि बंद पाळले जात आहेत. मराठा क्रांती मोर्चातर्फे काल सकाळी कल्याणातही निदर्शने करण्यात आली होती.
तर जालन्यातील घटनेचा निषेध म्हणून आज मराठा क्रांती मोर्चातर्फे आज कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण पश्चिमेच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत तसेच कल्याणच्या इतर भागात फिरून कल्याणकरांना बंदचे आवाहन केले आहे. तसेच हा बंद शांततामय मार्गाने पाळण्यात येणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान आजच्या या कल्याण बंदमधून अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल, रुग्णवाहिका, दुग्ध व्यवसाय, मेडीकल दुकाने आदींना वगळण्यात आल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तर यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा